हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |
चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले होते. केराँन पोलार्डच्या वादळी खेळीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत अशक्यप्राय वाटणारा सामना एकहाती मुंबई इंडियन्सनला विजय मिळवून दिला.
चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 218 धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 27 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. तर मोईन अलीने 57 तसेच फॅफ डु प्लेसीसने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. रवींद्र जाडेजानेही नाबाद 22 धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले होते.
मुंबई इंडियन्सने सुरूवात चांगली झाली होती. रोहित शर्मा 35 आणि डि काँक 38 धावावर बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादव 3 धावा काढून बाद झाले होते. त्यामुळे 9.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट 81 धावा होत्या. यावेळी चेन्नई सुपर किंग्सचे सामान्यावर वर्चस्व होते. 12 व्या षटकानंतर पोलार्ड आणि कुणाल पांड्या यांनी सामना रंगतदार स्थितीत आणला. 16 व्या षटकांत कुणाल पंड्या यांची विकेट पडल्यानंतर हार्दिक पंड्या याने 7 चेंडूत 16 धावा काढून बाद झाला. तर त्याच षटकात जिम्मी निशिम शून्यावर बाद झाला. अखेरच्या निर्णायक 6 चेंडूत 16 धावांची मुंबई इंडियन्सला विजयासाठी आवश्यकता होती. पोलार्ड स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसरा व तिसऱ्या चेंडू चौकार तर चौथा चेंडू निर्धाव गेल्याने दोन चेंडूत 8 धावांची गरज होती. त्यावेळी पोलार्डने षटकार मारला तर शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावाकेल्या. या खेळित त्याने 6 चौकार आणि 8 षटकार मारले.