हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Infrastructure । मुंबईची ओळख सांगायची झाली तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी … त्याच बरोबर क्रिकेट, बॉलीवूड ,उद्योग धंदे ,आंतरराष्ट्रीय बँकांची सेन्ट्रर, भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय, देशातील नामांकित उद्योगपतींचे निवासस्थाने मुंबईत असल्याचे मुंबई हे आंतराष्ट्रीय शहर म्हणून ओळखलं जाते… मुंबईला मायानगरी असेही म्हणतात. मागच्या काही वर्षात अनेक पायाभूत सुविधांमूळे तसेच नवनवीन रस्ते, ब्रिज , मेट्रो सेवा यामुळे मुंबईचा चांगलाच कायापालट झाला आहे. आता आगामी काळात अजून ५ असे प्रकल्प मुंबईत राबवण्यात येणार आहेत ज्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे प्रकल्प नेमके कोणते आहे? मुंबईकरांवर त्याचा काय परिणाम होईल ते आपण जाणून घेऊयात.
१) मुंबई मेट्रो 3 –
मुंबई मेट्रो लाइन ३ (अॅक्वा लाइन) हा जवळजवळ ३३.५ किमी लांबीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत कॉरिडॉर २०२५ च्या अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे अंधेरी,पवई , चेंबूर,विक्रोळी या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. तर आणखी एक महत्त्वाचा मेट्रोमार्ग म्हणजे लाईन ६ (पिंक लाइन) लोखंडवाला – विक्रोळी जी १४.५ किमी पर्यंत पर्यंत मेट्रो प्रकल्प तयार झाला आहे.तो पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे. काही दिवसात हि लाईन नागरिकांसाठी सुरु होईल. या दोन मेट्रो लाईनमुळ पवई, सीप्झ, चेंबूर आणि विक्रोळी या भागातील रिअल इस्टेट व्यवसायाने सद्या उच्चांकी पातळी गाठली आहे.
२) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – Mumbai Infrastructure
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देशांतर्गत टर्मिनल टप्पा हा एप्रिल २०२५ मध्ये सुरू झाला आहे, तर आंतरराष्ट्रीय विमान सेवा हि जुलै २०२५ पर्यंत सुरू होणार आहे. विमानतळाची क्षमता २०२९ पर्यंत ५ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. नवी मुंबईतील विमानतळाचा जर रिअल इस्टेटमधील परिणाम बघितला तर पनवेल, द्रोणागिरी आणि पुष्पक नगरमध्ये या भागातील घरांचे वाढलेले दर तसेच मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमधील गुतंवणूक हि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिणाम आहे.
३) मुंबई कोस्टल रोड प्रकल्प-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा (Mumbai Infrastructure) पहिला टप्पा हा मरीन ड्राइव्ह ते वरळी पूर्ण झाला आहे तर दुसरा टप्पा, वरळी ते कांदिवली हा सद्या कार्यान्वित आहे. या कोस्टल रोड प्रक्लापामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांमध्ये जाण्याचा वेळ २ तासांवरून ४० मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. याचा हा मरीन लाईन्स, हाजी अली, वरळी आणि त्यापलीकडे असलेल्या भागात मालमत्तेची किमत वाढल्या आहे.
४) वांद्रे सी लिंक प्रकल्प –
वर्सोवा आणि वांद्रे दरम्यानचा १७.१७ किमीचा हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण कमी करतो.. साधारणतः हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होऊ शकतो. या प्रकल्पामुळे, अंधेरी, वर्सोवा, ओशिवरा आणि वांद्रे येथील मालमत्तांच्या किमती वाढतील असा अंदाज आहे.
५) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन–
मुंबई (बीकेसी) ते अहमदाबाद पर्यंत ५०८ किमी हाय-स्पीड रेल्वेने चालवल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या फक्त २ तासांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि बोईसर या भागातील रिअल इस्टेट मध्ये तेजी दिसत आहे. तसेच ठाणे आणि त्या भागातील घरांच्या किमती वाढल्या आहे. या पाच प्रकल्पाचा (Mumbai Infrastructure) विचार केला तर या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागातील रिअल इस्टेट चेहरा मोहरा बदलला आहे.