मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतल्या स्टंटबाज सोनसाखळी चोराला (chain snatcher) अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. हा सोनसाखळी चोर (chain snatcher) बाईकवर स्टंटबाजीही करायचा. या बाईक स्टंटबाजीचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर अपलोड करत होता. पोलीस मागच्या काही दिवसांपासून या स्टंटबाज चोराच्या मागावर होते मात्र तो काही पोलिसांना सापडत नव्हता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या स्टंटबाज चोराला पोलिसांनी गोवंडीतून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि बाईक जप्त करण्यात आली.
आधी बाईक चोरायचा..
मोबाईल आणि चेन हिसकावण्यापूर्वी हा स्टटंबाज तरुण (chain snatcher) आधी दुचाकी चोरत होता. चोरलेल्या दुचाकीने महिलांच्या गळ्यातील चेन आणि मोबाईल हिसकावून तो फरार व्हायला. चोरलेल्या दुचाकींवरुन त्यानं स्टंटबाजी सुरु केलेली होती. गेल्या काही दिवसांपासून या फरार स्टंटबाज चोराचा शोध पोलीस घेत होते. अखेर मुंबईतील कुरार पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले.
अनेक गुन्हे दाखल
मोहम्मद मोहसीन लायक अहमद अन्सारी उर्फ रायडर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच तो गोवंडी येथील रहिवासी आहे. त्याच्यावर चेन स्नॅचिंग (chain snatcher), मोबाईल स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या आरोपीकडून पोलिसांनी ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, 30 ग्रॅम सोन्याची चेन आणि 1 पल्सर दुचाकी जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर




