Mumbai Lake Level : मुंबईतील ‘या’ 7 तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ

Mumbai Lake Level
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Lake Level। सततच्या पावसामुळे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सातत्याने पाण्याची वाढ होत आहे. २६ जून २०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबईतील तलावांमध्ये एकत्रित पाणीसाठा ५,२०,६१४ दशलक्ष लिटर इतका आहे, जो एकूण वार्षिक आवश्यक १४.४७ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या सुमारे ३५.९७ टक्के आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील सातही तलावामध्ये थोडीशी वाढली असून, काही भागात परत आज १० मिमी पाऊस पडल्याने हंगामातील एकूण ४५१ मिमी पाऊस झाला. मुंबईला एकूण सात ते आठ तलाव पाणी पुरवढा करतात. त्यात भाटसा,अप्पर वैतरणा,मोडक सागर, तानसा,तुळशी आणि विहार या तलावांचा समावेश येतो.

भाटसा तलावात लक्षणीय वाढ– Mumbai Lake Level

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाटसा तलावात लक्षणीय वाढ झाली आहे आणि आता २,१०,९७२ दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे, जो सर्व तलावांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत येथे ५ मिमी पाऊस पडला आणि आतापर्यंत एकूण ६९५ मिमी हंगामी पाऊस नोंदवला गेला आहे.

अप्पर वैतरणा आणि मोडक सागरमध्येही वाढ

अप्पर वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत गेल्या २४ तासांत ०.१२ मीटरने वाढ होऊन ती ५९९.१५ मीटरवर पोहोचली आहे. सध्याचा उपयुक्त साठा हा ९४,५८७ दशलक्ष लिटर आहे. तर कालपासून येथे १८ मिमी पाऊस पडला आहे. आणि एकूण ३७६ मिमी हंगामी पाऊस नोंदवला गेला आहे. मोडक सागर नदीत ०.०४ मीटरने थोडीशी घट झाली असली तरी अजूनही उपयुक्त साठ्यात ६९,७३२ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. गेल्या २४ तासांत तलावात ४ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे हंगामी ७७४ मिमी पावसात भर पडली, जो सर्व तलावांमध्ये सर्वाधिक आहे.

तानसा, मध्य वैतरणा नदीत माफक प्रमाणात वाढ-

तानसाच्या पातळीत ०.०८ मीटरने वाढ झाली, ज्यामध्ये ५७,८४८ दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. मध्य वैतरणा नदीतही ०.६१ मीटरने वाढ झाली, ज्यामध्ये उपयुक्त साठा ७८,४२० दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला. विहार आणि तुळशी हे लहान तलावाच्या पाणी पातळीत सुद्धा किरकोळ वाढ बघायला मिळाली. विहारमध्ये ०.०१ मीटरने वाढ झाली असून पाणीसाठा आता ३१,३६२ दशलक्ष लिटर झाला आहे, तर तुळशीमध्ये ०.०१ मीटरने वाढ झाली आहे आणि ३,२२६ दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्याचा पाणीसाठा ओक्के असला तरी, महापालिका अधिकारी सावध आहेत. येत्या काही महिन्यांत शहराचा अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.