हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Latur Vande Bharat Express । मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला केंद्र सरकार कडून नवनवीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली जात आहे. महाराष्टच्या कानाकोपऱ्यात सध्या सुमारे १२ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा सर्वच भागात वंदे भारत ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे. आता यामध्ये आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन जोडली जाणार आहे. हि रेल्वे मुंबई ते लातूर मार्गावर धावेल. प्रसारमाध्यमात याबाबत चर्चा सुरु आहेत. मुंबईवरून लातूर जाणाऱ्या प्रवाशांचा ३ ते ४ तासांचा वेळ या नव्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे वाचणार आहे.
मुंबई ते लातूरला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Latur Vande Bharat Express) सुरु व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून सतत मागणी केली जात होती. या मागणीला यश मिळाले असून रेल्वेकडून लातूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली असल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या घडीला, लातूर वरून मुंबईला जायचं असल्यास मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत, त्यातही ट्रेनने जायचं म्हंटल तर उशीर होतोय. परंतु नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे लातूर ते मुंबई प्रवास अतिशय जलद गतीने होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या बहुमूल्य वेळेचीही बचत होईल.
कसं असेल वेळापत्रक- Mumbai Latur Vande Bharat Express
माहितीनुसार, ही एक्सप्रेस ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सकाळी ६ वाजता निघेल आणि दुपारी दीड वाजता लातूरला पोहचेल. मुंबई लातूर वंदे भारत एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर या रेल्वे स्थानकावर थांबे मिळण्याची शक्यता आहे. Mumbai Latur Vande Bharat Express
लातूर मराठवाड्यातील प्रमुख शहर –
लातूर हे मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये गणले जाते. धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र म्हणून लातूर उदयास आले आहे. देशातील सोयाबीनचे सर्वात मोठं व्यापारी केंद्र लातूर येथे आहे. तसेच धार्मिक बाबतीत बोलायचं झाल्यास लातूर मध्ये सिद्धेश्वर, रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, विराट हनुमान मंदिर, सूरत शहवली दर्गा अशी अनेक धार्मिकस्थळं देखील आहेत. पर्यटनाच्या बाबतीत उदगीर किल्ला, औसा किल्ला, खरोजा लेण्या आणि गंज गोलाई हि लातूरची खास पर्यटन स्थळे आहेत. मूळची लातूरची असलेली आणि नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे मुंबई लातूर वंदे भारत ट्रेनचा मोठा फायदा होईल.




