Mumbai Local Mega Block: महत्त्वाची बातमी!! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक; वेळापत्रकात मोठे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Mega Block| मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून मध्य रेल्वे वर डबल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे 900 पेक्षा अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे आता दररोज प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत. या बाबतची माहिती मध्य रेल्वेने एक निवेदन जारी करून दिली आहे. तसेच मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आव्हान केले आहे.

रेल्वेचे प्रवाशांना आवाहन (Mumbai Local Mega Block)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोकल ट्रेन नेटवर्कच्या प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेने 30 मेपासून मध्यरात्री 63 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. ज्यामुळे याचा थेट परिणाम मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासांच्या वेळापत्रकावर होणार आहे. परंतु हा मेगा ब्लॉक दुरुस्ती आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांनी 3 दिवस सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. हा मेगाब्लॉक सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांवर घेण्यात आला आहे. याकाळात प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि रुंदीकरणाची कामे केली जातील.

महत्त्वाचे म्हणजे, 30 मे 2024 ते 3 जून 2024 दरम्यान 63 तासांचा म्हणजेच तीन दिवसांचा मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानकादरम्यान असणार आहे. हा मेगाब्लॉक गुरुवारी रात्रीपासून लागू असेल. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांनी या मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच रेल्वे प्रवासासाठी घराच्या बाहेर पडावे. कारण की, या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे किंवा गरज नसल्यास प्रवासही करू नये असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहेत.