Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, या रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक; बातमी वाचूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Mega Block । मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने १३ जुलै रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेने ट्रॅक अलाइनमेंट, ओव्हरहेड वायर बसवणे आणि इतर संबंधित कामे यासारखी आवश्यक देखभालीची कामे करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी रविवार मेगा ब्लॉक लागू केला आहे. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील ठाणे आणि विद्याविहार दरम्यानच्या सेवांवर या ब्लॉकचा परिणाम होईल. डीआरएम मुंबई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द ? Mumbai Local Mega Block

पाचव्या मार्गावर, सकाळी ०८:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर सहाव्या मार्गावर, सकाळी ०८:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. याव्यतिरिक्त, कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही हार्बर मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक लागू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सर्व डाउन सेवा रद्द राहतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या सर्व सेवा देखील रद्द राहतील. मेगा ब्लॉक दरम्यान, (Mumbai Local Mega Block) सीएसएमटी, कुर्ला, पनवेल आणि वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे हे वेळापत्रक बघूनच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं.

दुसरीकडे, पश्चिम रेल्वे शनिवार आणि रविवारी मध्यरात्री सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी ००:३० ते ४:०० वाजेपर्यंत अप जलद आणि पाचव्या मार्गावर ३ तास ३० मिनिटांचा जम्बो ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेणार आहे. या ब्लॉक कालावधीत, अप जलद मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि माहीम दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेने असेही स्पष्ट केले आहे की रविवार, १३ जुलै २०२५ रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक राहणार नाही.