Mumbai Local Mega block : जर उद्या तुम्ही खरेदी निमित्त किंवा इतर करण्यासाठी फिरायला बाहेर जाणार असाल तर ही बातमी आधी वाचून जा. कारण उद्या रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी मध्य रेल्वे कडून मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या उशिरा धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास माटुंगा ते मुलुंड अप डाउन धीम्या मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे दुपारी तीन वाजून 55 मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे. परिणामी ब्लॉगच्या वेळेमध्ये धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर (Mumbai Local Mega block) वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द तर काही विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ठाणे ते वाशी/ नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटे दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहेत. परिणामी ब्लॉगच्या वेळेमध्ये ट्रान्स हार्बर वरील ठाणे ते वाशी /नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ पनवेल अपडाऊन (Mumbai Local Mega block) लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे (Mumbai Local Mega block)
पश्चिम रेल्वेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास माहीम ते अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉक असलेल्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,वांद्रे- सीएसटी, सीएसएमटी गोरेगाव सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि काही चर्चगेट ते गोरेगाव मधला फेऱ्या देखील रद्द (Mumbai Local Mega block) करण्यात आला आहे.
सहा दिवसांचा रात्र कालीन विशेष ट्राफिक ब्लॉक
दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेने सहा दिवसांचा रात्र कालीन विशेष ट्राफिक ब्लॉक घोषित केला आहे. घाटकोपर ते भांडुप दरम्यान विक्रोळी उड्डाणपुलावरील गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉग घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉग शनिवार दिनांक ६ एप्रिल मध्यरात्रीत गुरुवार दिनांक 11 एप्रिल च्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत शनिवारी मध्यरात्री एक वाजून वीस मिनिट ते पहाटे चार वाजून पाच मिनिटांपर्यंत हा ब्लॉग असेल तर उर्वरित पाच दिवस मध्यरात्री तीन तास ब्लॉक असेल उशिरा रात्री धावणाऱ्या लोकल रद्द (Mumbai Local Mega block) करण्यात आल्या आहेत