हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मुंबईकरांसाठीचा हा प्रकल्प मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.
मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे प्रवासाचा (Mumbai Local Train) वेग वाढवणे आणि मुंबई उपनगरी रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कर्जत ते बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका उभारण्यात येत आहेत. ३२ किलोमीटरच्या मार्गात आठ मोठे पूल, १०६ लहान पूल असे एकूण ११४ पूल आणि एक वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बोगदा (रोडअंडर ब्रीज) तयार करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या दृष्टीने भविष्यातील मागणीही पूर्ण करता येईल, या नव्या मार्गिकांमुळे दक्षिण भारतासोबतच्या दळणवळणीय जोडणीची सुविधाही मिळू शकेल. बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेसह मुंबई-पुण्यातील प्रवाशांनाही लाभ होणार आहे.
गुजरातसाठीही आणखी एक प्रकल्प– Mumbai Local Train
बदलापूर ते कर्जत व्यतिरिक्त केंद्र सरकारने देवभूमी द्वारका (ओखा) – कानालूस दुहेरीकरण – 141 किलोमीटर प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील ४ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांमुळे रेल्वेचे नेटवर्क सुमारे २२४ किलोमीटरने वाढणार आहे. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजूरी दिल्याने ३२ लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे ५८५ गावांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यांचा प्रवास आणि दळणवळणाची सोय सोप्पी होणार आहे. विस्तारीत मार्गिकेच्या क्षमतेमुळे वाहतुकीचा वेग आणि व्याप्तीत वाढ होईल. तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.




