Mumbai Local Train : लोकल ट्रेनमधून मुलीला ढकलले!! मुंबईतील घटनेनं खळबळ (Video)

Mumbai Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून एका १८ वर्षाच्या मुलीला ५० वर्षाच्या व्यक्तीने ढकलून दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ’ दिसणाऱ्या त्या व्यक्तीने महिलांच्या डब्यात प्रवेश केला होता, त्यानंतर महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. यावेळी महिलावर्ग आणि त्या ५० वर्षाच्या व्यक्तीमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. याचदरम्यान, त्याने १८ वर्षाच्या मुलीला खाली ढकलले. सुदैवाने मुलीला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पोलिसांनी सदर नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

नेमकं काय घडलं? Mumbai Local Train

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवार, १८ डिसेंबर रोजी पीडित मुलगी तिच्या मैत्रिणींसह खारघर येथील त्यांच्या कॉलेजमध्ये जात होती. त्यांनी पनवेलहून सकाळी ७:५९ च्या पनवेल-सीएसएमटी लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात प्रवेश केला होता. त्याच वेळी शेख अख्तर नवाज नावाचा आरोपी देखील महिलांच्या डब्यात शिरला. त्याला पाहून महिला प्रवाशांनी आक्षेप घेतला आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. मात्र, महिलांच्या डब्यातुन बाहेर जायला तो तयारच नव्हता. त्यानंतर त्याठिकाणी शाब्दिक वाद झाले आणि रागाच्या भरात आरोपीने डब्याच्या पायदानाजवळ उभ्या असलेल्या मुलीला ढकलून दिले. या घटनेनंतर महिला प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख अख्तर नवाजला ताब्यात घेतलं. Mumbai Local Train

Mumbai local: Disoriented guy pushes 18 year-old girl out of moving train!
byu/ObligationDry5522 inmumbai

पीडित मुलगी पनवेलपासून सुमारे १.५ किमी अंतरावर रुळांवर पडली. जीआरपीच्या पथकाने तिचा शोध घेतला असता, ती घटनास्थळी कुठेही आढळली नाही. परंतु नंतर असं समजले कि स्थानिक रहिवाशांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले होते. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दुसरीकडे आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाखाली बीएनएस कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला . त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले असता तो ‘मानसिकदृष्ट्या अस्वस्थ’ असल्याचे सांगितले. आरोपी शेखला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.