Mumbai Local Train : मुंबईकरांनो, आता दर 2:30 मिनिटांनी मिळणार लोकल; नव्या सिस्टीममुळे वेळ वाचणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन (Mumbai Local Train) … असं समजा कि या लोकल ट्रेनवरच मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून असतंय. कारण नोकरदार वर्ग दररोज लोकलच्या माध्यमातूनच आपल्या कामाच्या ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे जर लोकल ४-५ मिनिटे जरी लेट झाली तरी संपूर्ण दिवसाचे गणित बिघडत. अनेकदा कोलमडणारे वेळापत्रक, तसेच तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांना ताटकळत राहण्याची वेळ येते. परंतु आता यावर मार्ग काढण्यात आला आहे. मुंबईकरांना आता दर २:३० मिनिटांनी लोकल ट्रेन मिळणार आहे. त्यासाठी नव्या सिस्टीमवर काम सुरु असून प्रवाशांचा वेळ नक्कीच वाचणार आहे.

वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत – Mumbai Local Train

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेनसाठीच्या (Mumbai Local Train) नव्या प्रणालीविषयी माहिती दिली. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे असं त्यांनी म्हंटल. सीबीटीसीयंत्रणेने सुसज्ज असणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.

कवच ही स्वदेशी अँटी कॉलिजन यंत्रणा आहे, तर सीबीटीसीची जबाबदारी गाड्यांमधील अंतर कमी करण्याची आहे. दोन्ही तंत्रज्ञानाच्या विलीनीकरणामुळे मुंबईच्या उपनगरीय प्रवासात नवीन क्रांती होईल. CBTC हा मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A च्या घटकांपैकी एक आहे जो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने विकसित केला आहे. या नवीन प्रयोगामुळं अपघात तर कमी होतीलच याशिवाय दोन गाड्यातील अंतरदेखील कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांना जास्त वेळ रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावं लागणार नाहीये. या नव्या सिस्टीममुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होणार आहे. मात्र हि प्रणाली कधीपासून सुरु होणार हे मात्र अजून समोर आलेलं नाही.