हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद आणि वेगवान होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असं जिला म्हंटल जाते त्या लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) डब्याची संख्या वाढणार आहे. यापूर्वी १२ डब्याची असलेली लोकल ट्रेन आता १५ डब्बे घेऊन धावणार आहे. मध्य रेल्वेवर हा बदल पाहायला मिळेल. खरं तर लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात, साहजिकच जीव मुठीत घालून, अतिशय गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे १२ डब्यांच्या ट्रेनऐवजी १५ डब्यांच्या ट्रेनची मागणी बऱ्याच काळापासून होती, जी रेल्वेने आता मान्य केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कधीपासून धावणार 15 डब्यांची लोकल ट्रेन? Mumbai Local Train
15 डब्यांच्या लोकल फास्ट (Fast) आणि स्लो (Slow) अशा दोन्ही मार्गिकांवर धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांपैकी 27 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सध्या सुरु आहे. हे विस्तारीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकदा का हे काम पूर्ण झाले कि मग 15 डब्यांच्या लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) डब्ब्यांची संख्या वाढल्याने एकाच वेळी जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. यामुळे गर्दीही कमी होईल आणि प्रवासही आरामदायी होईल.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले, “मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. आम्ही डिसेंबरपर्यंत २७ स्थानके पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यानंतर १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवली जाईल.
कोणकोणत्या स्थानकाचे विस्तारीकरण होणार?
ज्या स्थानकांवर काम सुरू आहे त्यात विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, शेलू, बदलापूर, भिवपुरी, पळसधारी, वाशिंद, मुंब्रा, कळवा, कोपर, ठाकुर्ली, कसारा आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सीएसएमटी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी आणि खडवलीसह इतर सात स्थानकांवर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.




