Mumbai Local Trains : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार आरामात!! केंद्र सरकारकडून घोषणांचा पाऊस

Mumbai Local Trains
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Trains मुंबई लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी… दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी पोचतात. परंतु लोकल ट्रेनला असलेली गर्दीमुळे खूप हालअपेष्टा सोसत मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. प्रवाशांना जास्त त्रास होऊ नये, त्यांना आरामात लोकल ट्रेनचा अनुभव घेता यावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून नवनवीन प्रयत्न आणि उपाययोजना सुरु आहेतच. आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेतून मुंबई लोकल ट्रेनबाबत अनके मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी स्वयंचलित दरवाजा बंद प्रणाली असलेल्या २३८ नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. गर्दीचा ताण पडू नये म्हणून मेल एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांची क्षमता वाढवण्यात येईल. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत हि माहिती शेअर केली आणि केंद्र सरकारचे आभार मानले.

काय आहे फडणवीसांचे ट्विट? Mumbai Local Trains

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल कि, मुंबईकरांसाठी मोठी बातमी! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुंबईतील रेल्वे सेवांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्पांची सुरुवात केली आहे.

स्वयंचलित दरवाजा बंद प्रणाली असलेल्या २३८ नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत
१२० मेल एक्सप्रेस गाड्या आणि ३२०० उपनगरीय गाड्यांची क्षमता वाढवली जात आहे
वांद्रे येथे ३ पिट लाईन्स
मुंबई सेंट्रल येथे २४-डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार
एलटीटी येथे डेपोचा विस्तार
अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म:
▪️जोगेश्वरी: २
▪️दादर: १
▪️वसई रोड: ६
▪️पनवेल: ५
▪️कळंबोली: ५
▪️कल्याण: ६
▪️परळ: ६

या प्रकल्पांमुळे प्रवासात मोठी सुधारणा होईल आणि मुंबईकरांचा दररोजचा प्रवास खूप सोपा होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.