Mumbai Mega Block Update| मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block Update) असणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही लोकल सेवा उशिराने सुरू होतील तर काही गाड्या प्रवाशांच्या सेवेत हजर नसतील. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना मेगाब्लॉकचा त्रास सहन करावा लागू शकतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीमध्ये बोरिवली-गोरेगावदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. तसेच काही लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकमुळे अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून धावेल.
याठिकाणी मेगाब्लॉक नाही (Mumbai Mega Block Update)
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर कोणत्याही प्रकारचे मेगाब्लॉक नसेल. परंतु,19 , 20 ,21 एप्रिल रोजी रात्री मध्य रेल्वेतील सीएसएमटीमधील पायाभूत कामांसाठी पॉवर ब्लॉक घेतले जाणार आहे. (Mumbai Mega Block Update) यामुळे सीएसएमटी स्थानकातून रात्रीची शेवटची लोकल 12.14 वाजता सोडण्यात येईल. तसेच, या कालावधीत सीएसएमटी-भायखळा-हार्बर येथील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद राहील. याचबरोबर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची सेवा या कालावधीत बंद असेल. या सर्व बाबींची खबरदारी घेऊन मुंबईकरांनी प्रवासासाठी घराबाहेर पडावे.