हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro 3 । राज्याची राजधानी असलेली मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आण बाण आणि शान मानली जाते. २४ तास चालणारे आणि कधीही न थांबणारे शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. आजघडीला मुंबईची लोकसंख्या हि २ कोटी आहे. साहजिकच मुंबईतील नागरी सुविधा आणि वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्य सरकारने वाहतूक कोंडी संपवण्यासाठी बरेच पर्यंत करून देखील मुंबईतील वाहतुकीची समस्या काही संपली नाहीत. मुंबईची जीवनवाहीनी असलेल्या लोकल रेल्वे देखील आता मुंबईकरांना अपुरी पडत आहे. म्हणून काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे वाढविण्याचा पर्यंत चालू आहे. एका बाजूला हे जरी खरं असलं तरी राज्य सरकार मेट्रो कंपनीला योग्य ते सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने नोव्हेंबर २०२३ मध्ये भूमिगत मेट्रो ३ च्या नेव्हीनगर पर्यंत विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला असला तरी, राज्य सरकार आणि एमएमआरसी बोर्डाकडून मंजुर झाला नाही,असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मुंबई मेट्रो ३ चा नेव्हीनगर पर्यंतचा विस्तार रखडला आहे.
खरं तर तत्कालीन ठाकरे सरकार मधील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान ५ किमी (प्रत्येक दिशेने २.५ किमी) विस्ताराचा निर्णय सुरुवातीला जाहीर केला होता. तेव्हा नौदलाच्या कार्यालयाने राज्य सरकारला केलेल्या विनंतीवरून हा विस्तार करण्यात आला .कारण हा प्रस्ताव दाट लोकवस्ती असलेल्या भागातील रहिवाशांसाठी फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि राज्य कर्मचार्यांची निवासी घरे असल्याने हा मार्ग लोकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे.
मेट्रो ३ कॉरिडॉर (Mumbai Metro 3) या योजनांनुसार विस्तारित मेट्रो मार्गाचे (Mumbai Metro 3) बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणारा आहे. कारण सद्याची परस्थितीत पहिले तर, कुलाबा ते सीप्झला बीकेसी मार्गे जोडणाऱ्या जवळजवळ ३३ किमी लांबीच्या मार्गापैकी २२ किमी आरे ते बीकेसी दरम्यान प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. तर कफ परेड आणि कुलाबा पर्यंतचा उर्वरित मार्ग सध्या चाचणीच्या प्रक्रियेत असून, एका अधिकाऱ्याने सांगितले की, “काही फिनिशिंग कामे आणि एकात्मिक चाचणीची कामे पूर्ण झाल्यास हा देखील मार्ग चालू होणार नाहे.
दोन्ही विमानतळ टर्मिनल्सना कनेक्ट करेल– Mumbai Metro 3
मेट्रो ३ हा विस्तारित प्रकल्प हा पूर्णपणे सुरु झाल्यानंतर,सहा व्यावसायिक जिल्हे, ३० कार्यालये, १२ शैक्षणिक संस्था, ११ प्रमुख रुग्णालये, १० वाहतूक केंद्रे, २५ धार्मिक आणि मनोरंजन केंद्रे जोडेल जाणार आहे.तसेच कालबादेवी, नरिमन पॉइंट, कफ परेड आणि बीकेसी सारख्या सेवा देणाऱ्या आणि कॉर्पोरेट कार्यालय असणारा हा भाग जोडला जाणार आहे. त्याच बरोबर हा मेट्रो मार्ग दोन्ही विमानतळ टर्मिनल्सना देखील कनेक्ट करेल.
एमएमआरसीच्या मते, दीर्घकाळात, मेट्रो ३ मधील ८५% प्रवासी रस्त्यांवरून येण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये दररोज सुमारे ४.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होण्याचा अंदाज आहे. सिस्टम पूर्ण क्षमतेने पोहोचल्यानंतर ही संख्या दररोज सुमारे ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईसाठी हा मेट्रो ३ विस्तारित प्रकल्प पूर्ण होणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून लक्षात येईल..