हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro Depot। मुंबईतील मेट्रो कारशेडचा प्रश्न सुटला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे 174.01 हेक्टर जमीन मिळाली आहे. याच भागात सर्वात मोठा मेट्रो डेपो उभारण्यात येणार आहे. सीएसएमटी ते मीरा रोड पर्यंत सुमारे ५६ किमी अंतरावर असलेल्या मेट्रो लाईन्स ४, ४अ, १० आणि ११ साठी हा डेपो देखभाल आणि ऑपरेशन हब म्हणून काम करेल. खरं तर मेट्रो कारशेड साठी यापूर्वी कांजूरमार्गची जागा निवडण्यात आली होती. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेदामुळे कांजूरमार्गवर हे कारशेड होऊ शकलं नाही. आता ही कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आली आहे.
सरकारी ठरावानंतर ही जमीन अधिकृतपणे एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. डेपोचे (Mumbai Metro Depot) काम लवकरच सुरू होईल. या कारशेडसाठी 904 कोटी रुपयांचे कंत्राट मे. एसईडब्ल्यू-व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. या मेट्रो डेपोमध्ये ६४ स्टेबलिंग लाईन्स, २० देखभाल लाईन्स, नियंत्रण केंद्रे, स्वयंचलित ट्रेन वॉश सिस्टम आणि इतर जड देखभाल सुविधा असतील. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हंटल, “मोघरपाडा मेट्रो डेपो हा मुंबईच्या अधिक कनेक्टिव्ह आणि प्रवासी-केंद्रित भविष्याच्या प्रवासात एक कोनशिला आहे. मेट्रो लाईन्स ४, ४अ, १० आणि ११ चे मध्यवर्ती केंद्र म्हणून, हे कारशेड शहरातील अखंड, विश्वासार्ह सेवा सुनिश्चित करेल.
वडाळा ते कासारवडवली आणि गायमुख पर्यंत अनुक्रमे मेट्रो लाईन ४ आणि ४अ, दररोज अंदाजे १२ लाख प्रवाशांची ने आण करतात. या मेट्रो लाईन मुळे प्रवाशांचा निम्मा वेळ वाचतो. आता नवीन उभारण्यात येणारे मेट्रो डेपो (Mumbai Metro Depot) मेट्रो लाईन्स १० आणि ११ ची देखभाल करेल. घरपाडा येथील डेपोमुळे तांत्रिक अडचणींदरम्यान केंद्रीकृत व्यवस्थापन आणि जलद प्रतिसाद वेळ मिळेल.
मोघरपाडा मेट्रो डेपो मध्ये काय सुविधा मिळणार ? Mumbai Metro Depot
रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी 64 स्टेबलिंग ट्रॅक
मोठ्या देखभालीसाठी 10 वर्कशॉप ट्रॅक
आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा
तपासणीसाठी 10 निरीक्षण ट्रॅक
चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ




