Mumbai Metro Line 1 : मुंबईकरांच्या गर्दीची कटकट मिटणार; ‘या’ मेट्रो लाईनवर आता 4 ऐवजी 6 डब्बे असणार

Mumbai Metro Line 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro Line 1 । मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईवरील लोकलचा ताण कमी व्हावा यासाठी मुंबईत मेट्रो सुरु केली होती. मुंबईतील पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर धावली… या मेट्रोला ४ डब्बे जोडण्यात आलेले आहेत. मात्र तरीही या मेट्रो लाईन वर प्रवाशांची नेहमीच गर्दी बघायला मिळते. मेट्रोच्या सततच्या फेऱ्या असूनही हि गर्दी काय कमी होण्याचं नाव घेत नाही. अखेर यावर उपाय म्हणून आता वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो ४ ऐवजी ६ डब्ब्यांची करण्यात येणार आहे. मेट्रो 1 मार्गिकेचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीने मेट्रो गाडीकरिता अतिरिक्त इबे खरेदी करण्यासाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर केला आहे.

रोज किती प्रवासी प्रवास करतात ? Mumbai Metro Line 1

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 5 लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. गर्दीच्या वेळी या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात. हि गर्दी सोडवण्यासाठी मेट्रोचे डब्बे ४ वरून ६ करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या मेट्रो १ गर्दीच्या वेळेत ३ मिनिटे २० सेकंदांच्या वारंवारतेसह ३६ फेऱ्या चालवते. सध्याच्या प्रणालीमध्ये गर्दीच्या वेळेत प्रति ट्रिप सुमारे १८०० आणि गर्दी नसलेल्या वेळेत १५०० प्रवासी प्रवास करतात. परंतु , ११ वर्षांपूर्वी कॉरिडॉर सुरू झाल्यापासून सहा कोच गाड्यांच्या प्रवाशांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. आता हि मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे. Mumbai Metro Line 1

रेल्वे विस्ताराव्यतिरिक्त, MMOPL घाटकोपर आणि अंधेरी स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत लहान लूप फेऱ्या चालवणाऱ्या मिक्स लूप सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. एकूण प्रवाशांपैकी ८८ टक्के प्रवाशांना सेवा देणाऱ्या या सेवा जूनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या कारण वर्सोवा डीएन नगर आणि आझाद नगर स्थानकांवर गर्दी कमी झाली होती, जे एकत्रितपणे मेट्रो १ च्या प्रवाशांच्या १२ टक्के आहेत. मिश्र लूप सेवा थांबवण्यात आल्या असल्या तरी, एमएमओपीएलने वारंवारता राखण्यासाठी दररोज ४५२ अतिरिक्त फेऱ्या चालवणे सुरू ठेवले आहे.

दरम्यान, वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेची (Mumbai Metro Line 1 )खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारणी करण्यात आली होती. वर्सोवा हे पश्चिम टर्मिनस आणि घाटकोपर हे पूर्व टर्मिनस आहे. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो लाईन वर वर्सोवा, डी. एन. नगर, अझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, चकाला (जेबी नगर), एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, सुब्रह्मण्यम रोड, जागृती नगर, आणि घाटकोपर अशी १२ स्टेशन आहेत. या प्रकल्पासाठी 2 हजार 356 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यात रिलायन्स इन्फ्राची 74 टक्के, तर एमएमआरडीएची 26 टक्के भागीदारी आहे. मेट्रो 1 मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे 1,711 कोटी रुपयांचे कर्ज आहे.