ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाइन ५ प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर, लोकलच्या गर्दीवर ताण कमी होईल. या मार्गावर एकूण १५ स्थानकं असतील, ज्यामुळे भिवंडीतून मुंबईकडे येणाऱ्यांसाठी प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होईल.
मेट्रो मार्ग ५ चा तपशील
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असणार आहे. हा मार्ग ठाणे आणि भिवंडी यांना जोडून मेट्रो सेवेची सुविधा देईल. ३१ मार्च २०२५ पर्यंत मेट्रो सेवा सुरू होईल. यामुळे भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येणाऱ्यांसाठी प्रवासाची वेळ ५०% ते ७५% कमी होईल.
मेट्रो मार्ग ५ सध्याच्या मेट्रो मार्ग-४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-१२ (कल्याण ते तळोजा) सोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागातील नागरिकांना उत्तम सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळणार आहे.
१५ स्थानकं असतील
१. बाळकुम नाका
२. कशेली
३. काल्हेर
४. पूर्णा
५. अंजुरफाटा
६. धामणकर नाका
७. भिवंडी
८. गोपाळ नगर
९. टेमघर
१०. रजनोली
११. गोव गाव
१२. कोन गाव
१३. लाल चौकी
१४. कल्याण स्टेशन
१५. कल्याण एपीएमसी
प्रकल्पाच्या विलंबाबद्दल:
हा मेट्रो प्रकल्प अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १ सप्टेंबर २०१९ रोजी दिला गेला होता. सुरुवातीला या कामाचे पूर्ण होण्याचे लक्ष्य १ मार्च २०२२ होते, पण आता नवीन डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ८४१६.५१ कोटी रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. मेट्रो मार्ग ५ रोजी ३ लाख प्रवासी प्रवास करु शकतील, आणि प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये १७५६ प्रवाशांची क्षमता असेल.