हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाग्रस्तांची मृत्यूची आकडेवारी राज्य सरकार लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणतीही आकडेवारी लपवली नसल्याचं म्हंटल. त्यांनी केलेल्या भाजपवरील आरोपानंतर मुंबई महापालिकेत विधानपरिषदेचे विरोधी प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी थेट महापालिकेकडूनच लसीकरणाबाबत पक्षपातीपणा केला जातो आहे. मात्र, तसे घडू देणार नाहि. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना मोफत लस मिळवून देणार असल्याचे यावेळी सांगितले.
मुंबईत कोरोनाच्या कोरोनाच्या लसिवाटपावरून भाजपकडून महापालिकेवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबत योग्य नियोजन करण्यात आलेले नसल्याची टीका विरोधीपक्षनेते दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकांना कोरोनाप्रतिबंधक लस मिळावी म्हणून आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आज महापालिकेच्या आयुक्तांचीही आम्ही भेट घेतली. यावेळी आमच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेने लसीकरण करता यावे म्हणून ग्लोबल टेंडर काढावे व त्याद्वारे लस खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
आमच्या मागणीनंतर महापालिकेच्या आयुक्तांनीही अशा प्रकारे काम करण्याचं आश्वासन आम्हाला भेटीवेळी दिल. मुंबई महापालिकेकडून लसीकरण केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. मात्र आमच्या पक्षातील आशिष शेलार व अतुल भातखळकर यांच्या मतदार संघात मात्र लसीकरण केंद्रच नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून लसीकरण वाटपाबाबत पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आलं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा पक्षपातीपणा चालू देणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.