Mumbai New Terminus: ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील नवीन टर्मिनस प्रवाशांच्या सेवेत ; मेट्रो आणि लोकलही जोडणार

0
1
mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai New Terminus : मुंबई केवळ राज्याची राजधानी नाही तर येथून संपूर्ण राज्याची सूत्र हालतात. मुंबई मोठ्या आर्थिक उलाढालीचं शहर आहे. त्यामुळे मुंबईहून संपूर्ण देश आणि राज्यातील छोटी मोठी शहरं जोडली गेलेली आहेत. मुंबईला इतर भागांशी जोडणारी मुख्य कनेक्टिव्हिटी म्हणजे रेल्वे. सध्या राज्याअंतर्गत दळणवळणासाठी दादर, वांद्रे, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी येथून मेल आणि एक्स्प्रेस गाड्या (Mumbai New Terminus) सुटतात. मात्र आता आणखी एक टर्मिनस वाढणार आहे. त्याचे नाव जोगेश्वरी टर्मिनस असून त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार आहे. चला जाणून घेऊया या नव्या टर्मिनस बाबत.

सध्या या नव्या टर्मिनसचे काम सुरु असून जोगेश्वरी टर्मिनसचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरअखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान बांधले जात आहे. या टर्मिनसचे नावदेखील जोगेश्वरी टर्मिनस असं असणार आहे.

काय होणार फायदा ? (Mumbai New Terminus)

  • एकदा का हे टर्मिनस सुरू झाले तर मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांसाठी अतिरिक्त मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार आहेत.
  • या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जात आहे. या प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला ट्रेन उभी राहणार आहे.
  • भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढविणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • या टर्मिनसवर तीन मार्गिका असून त्यावरून केवळ मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
  • जोगेश्वरी टर्मिनसवरून १२ अतिरिक्त एक्स्प्रेस गाड्या भारतातील विविध भागांमध्ये धावणार आहेत.

मेट्रो आणि लोकलही जोडणार

महतवाची बाब म्हणजे जोगेश्वर टर्मिनसला मेट्रो मार्ग 7, मेट्रो मार्ग 2 अ आणि मेट्रो मार्ग 6 च्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या ट्रेनपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे. मेट्रो जोडली गेल्यामुळे (Mumbai New Terminus) प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.

राममंदिर स्थानकाशी जोडणार (Mumbai New Terminus)

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या टर्मिनसला राममंदिर स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी फूटओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात येणार आहे. बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये (Mumbai New Terminus) असणार आहे. दोन मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे.

76.48 कोटी रुपयांचा खर्च (Mumbai New Terminus)

या टर्मिनसच्या बांधकामासाठी 76.48 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एस्कलेटर बसवले जाणार नसले तरी प्रवाशांसाठी लिफ्ट आणि वेटिंग लाउंजची सुविधा असणार आहे. टर्मिनसच्या परिसरातील रस्त्यांचा विकास आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूणच मुंबईच्या विकासात यामुळे आणखी भर पडणार आहे.