Mumbai News : मुंबईतील कस्टम विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल नऊ कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे (Mumbai News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी केवळ सोनेच नाही तर 1.38 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि 45 लाख रुपयांचे परदेशी चलन देखील जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी (Mumbai News) सात जणांना अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. एकूण चोवीस प्रकरणांमध्ये हे कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक (Mumbai News)
खरंतर 10 जुलै ते 14 जुलै या पाच दिवसात सात जणांना अटक करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमधील आरोपींना अटक केली असून सोन्याची तस्करी ही मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, सोन्याचे बार, कपड्यांमध्ये, कागदाच्या थरांमध्ये, शरीरात आणि त्यांच्या शरीरावर (Mumbai News) लपवून ठेवलेले होते. वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एका स्पेशल ऑपरेशनच्या दरम्यान दुबई (२), अबुधाबी (२) आणि जेदा इथून (१) प्रवास करणाऱ्या पाच भारतीय नागरिकांना रोखण्यात आलं आणि त्यांच्याकडे 24 कॅरेट सोन्याची धूळ, 24 कॅरेट कच्च्या सोन्याच्या चेन आणि एकूण 4850 वजनाच्या बांगड्या आढळून (Mumbai News) आल्या. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत सोने जप्त करण्यात आले.