Mumbai News : यंदाच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये (Mumbai News) एका महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तो प्रकल्प म्हणजे ‘अटल सेतू’. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख या अटल सेतूची आहे. अटल सेतूचा प्रवास हा अनेकांसाठी फायद्याची बाब ठरली. मात्र अटल सेतूला सुद्धा टक्कर देईल असा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. खरंतर हा मार्ग काही नवा नाही पण त्याची बांधणी आता नव्याने होत आहे त्यामुळे एका नव्या रूपात वाहन चालकांसाठी हा मार्ग सज्ज होत आहे. आम्ही ज्या मार्गाबद्दल बोलत आहोत तो मार्ग म्हणजे ‘मानखुर्द वाशी खाडी पूल’. मिळालेल्या माहितीनुसार खाडी पुलाचा मुंबई नवी मुंबईचा टप्पा हा जून 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर ठाण्याला जोडणारा संपूर्ण मार्ग पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
या मार्गाची जबाबदारी ही एल अँड टी लिमिटेड या कंपनीने घेतली असून जवळपास 559 कोटी रुपयांच्या खर्चात हा पूल उभारणार आहे. या पुलाचे बांधकाम 2020 मध्ये सुरू झालेलं होतं आता हे बांधकाम पूर्ण होत असल्यामुळे (Mumbai News) वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे
या मार्गाबाबत माहिती देताना एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकल्पाचा सुमारे 73 टकके काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या पुलावरून दररोज दोन लाख गाड्या धावतात नवीन पूल गजबजलेल्या रस्त्यांवर (Mumbai News) अखंड रहदारी वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होईल. अतिरिक्त लेनमुळे रहदारीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
कसा असेल मार्ग ? (Mumbai News)
या पुलाचा मुख्य स्पॅन 1.84 किलोमीटर लांबीचा असून 1.25 किलोमीटर मार्ग आणि टोल प्लाझा आहे. सध्याच्या सहा पदरी असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तीन लेनचे दोन पूल असतील नवीन पुलामुळे आणखी सहा मार्गे का जोडल्या जाणार असून एकदा (Mumbai News) ते पूर्ण झालं की पुलाची एकूण रुंदी वर आणि खाली प्रत्येक दिशेने सहा लेन होईल.