Mumbai News : मागच्या काही वर्षात मुबंईच्या विकासात भर घालणारे अनेक मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत तर काही प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अटल सेतू , कोस्टल रोड , मुंबई मेट्रो , बुलेटट्रेन प्रोजेक्ट अशी उदाहरणे सांगता येतील. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
कुलाबा ते सिप्झमार्गावरील मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेज मधल्या सिप्झ आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानचा मार्ग हा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तर दुसरी आणि एक विशेष बाब जुलै महिन्यापासून मुंबईतल्या (Mumbai News) पहिल्या वाहिल्या मेट्रोची अंडरग्राउंड सेवा सुरू केली जाईल अशी माहितीही समोर आली आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे निगमला 1163 कोटी (Mumbai News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए ऐवजी थेट मुंबई मेट्रो रेल्वे (Mumbai News) निगमला 1163 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सदर प्रकल्पाचे काम हे 98% पूर्ण झाला आहे यासाठी एकूण 37 हजार 725 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य विकास महामंडळाकडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळांने मंजुरी देण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाने कर्जासाठी एमएसआरडीसी ला सरकारी गॅरेंटी देण्याचाही निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1130 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी 21५. 80 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार सरकारने जमीन ताब्यात घेण्याआधीच 2341 कोटी 71 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
जुलैपासून पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार (Mumbai News)
मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मुंबईमधील अंडरग्राउंड पहिल्या मेट्रोची यशस्वीपणे ट्रायल रन घेतली असून कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून सेवा सुरू होणार आहे. मुंबईतील या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रो प्रोजेक्टमध्ये 33.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. हा मार्ग आरे कॉलनीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 69 स्टेशन्स असणार आहेत यापैकी 26 स्टेशन जमिनीखाली असणार आहेत. 2017 मध्ये मेट्रोच्या या भुयारी मार्गाचे काम सुरू झालं मात्र कोरोनामुळे या कामाला फटका बसला. एकूण 56 किलोमीटरच्या मार्गावर खोदकाम करून मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. या मार्गावरील पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यादरम्यानचा (Mumbai News) आहे. हाच पहिला टप्पा आता जुलैमध्ये सुरू होणार आहे.
पुण्यासाठी मोठा निर्णय (Mumbai News)
मंत्रिमंडळांना पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पासाठी हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कडून 5500 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठीचा एमएसआरडीसी चा प्रस्ताव मान्य केला आहे. एकूण 972 कोटी सात हेक्टर जमिनीपैकी 535.41 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. सरकारने जमीन अधिग्रहणासाठी 1876 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध (Mumbai News) करून दिले आहे.