सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुबई प्रतिनिधी । मुंबई पोलिसांनी गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या कारवाईत बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना या मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाच्या आरोपात अटक केली. या दोघींपैकी एक मॉडेल आहे.

पोलीस उपायुक्त डी स्वामी यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचत पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकून कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींची भेट घेतली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही दोन तरुणींची सुटका केली असून, दोघींना अटक केली आहे,” अशी माहिती पोलिसांना दिली आहे.