हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआय कडून तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी बदली प्रकरणात राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांच्यावर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या चौकशीपुर्वी पांडे यांना सीबीआयने समन्स बजावले होते. या प्रकरणासह 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातही त्यांची चौकशी झाली.
बदली घोटाळा प्रकरणात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची चाचपणी ही स्वत: संजय पांडे करत होते.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे ही चौकशी होणार होती. त्यावेळी परमबीर सिंग यांनी पांडेंची भेट घेतली होती, त्यावेळी पांडे यांचा फोन टॅप करण्यात आला होता. त्यानंतरच या सर्व प्रकरणाला वाचा फुटला.
Mumbai Commissioner of Police, Sanjay Pandey was examined by CBI yesterday for 6 hours for his alleged role to influence the complainant while the case related to former Home Minister Anil Deshmukh was being heard in High Court: CBI Sources
— ANI (@ANI) March 12, 2022
या घटनेनंतर पांडे यांनी या समितीवरुन त्यांचं नाव काढावं अशी मागणी न्यायालयात केली होती. याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने सहा तास पांडे यांची चौकशी केलीये. दरम्यान, परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेले देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपाअंतर्गत चौकशी सुरू आहे. 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.