मुंबई । मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण ९ झाली आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पुन्हा एका पोलिसाचा मृत्यू आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलीस दल आणि राज्यातील पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशा वेळी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं पोलिसांच्या जीवाला दिवसेंदिवस धोका वाढत आहे.
दरम्यान, खबरदारी म्हणून गेल्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील पोलिसांना रजेवर पाठवण्यात आले आहे. शिवाय ज्या पोलिसांना आजार आहेत, त्यांनाही रजा घेण्यास सांगितले आहे .राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये १००हून अधिक पोलीस अधिकारी आणि ९०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण ९ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”