हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील कडक उपोषण करत असताना दुसरीकडे मुंबईत मराठा बांधव रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती काल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात दिली. त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबई मोकळी करा असे निर्देश कोर्टाने मराठा आंदोलकांना दिले. कोर्टाच्या या आदेशामुळे मराठा बांधवाना धक्का बसला असतानाच आज मुंबई पोलिसांनी थेट मनोज जरांगे पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे. आझाद मैदान रिकामं करा अशा स्पष्ट सूचना या नोटिसी मधून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाचं नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
काय म्हंटल आहे नोटीस मध्ये ? Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil
आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे. आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आझाद मैदान मोकळं करा. आपणास आम्ही फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र तुम्ही या अटींचे उल्लंघन केलं असं या नोटिशीत म्हंटल आहे. तसेच मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यचाही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही या नोटीसमध्ये (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) करण्यात आला आहे.
खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी एक हमीपत्र देण्यात आलं होते, त्याच आपण पालन करू अशी हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. परंतु त्यातील बहुतांश अटीशर्तींचे पालन हे झालंच नाही. त्यातच मराठा बांधवानी मुंबईतील रस्त्यांवर केलेली हुल्लडबाजीही अंगलटी आली असं म्हणावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यांवर मराठा बांधव खो खो कबड्डी खेळताना दिसले. काहींनी तर पोलिसांच्या बॅरेकेटलाच गाडी करून त्यावरून रस्त्यावर फिरताना दिसले… काही ठिकाणी आंदोलकांकडून अरेरावीचे प्रकार घडले. बेस्ट बसमधील प्रवाशांना मारहाण केल्याची घटना समोर आली. या सर्व गोष्टींची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आणि मनोज जरांगे पाटील याना नोटीस पाठवत (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) आझाद मैदान खाली करण्यास सांगितलं. आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? पोलिसांच्या नोटिशीला कस उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.




