Mumbai Pune Expressway च्या जवळच उभारण्यात येणार नवी स्मार्ट सिटी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – मुंबई या द्रूतगती महामार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या महामार्गाच्या निर्मितीपासून तेथे अनेक नवीन प्रकल्प उभारण्याच्या योजना आखल्या गेल्या. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या जवळच नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढाकार घेतला आहे. पुणे – मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरालगतच नोकरी, व्यवसाय तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना सोयीचे वाटेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी MSRDC ने स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रूतगती महामार्गाच्या दक्षिण – पश्चिम दिशेकडील क्षेत्राकरिता MMRDC ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर स्मार्ट सिटी उभारण्याचे प्रयत्न

समृद्धी महामार्ग हा प्रत्येकासाठी एक अशा निर्माण करणारा महामार्ग आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा त्याचा वापर करत स्मार्ट सिटी निर्माण करण्याचे नियोजन आहे. MSRDC ची एकूण 71 गावे आणि त्यातील 184 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन अधिकारी म्हणून रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातून 30 किमीचा महामार्ग जातो. याचाच वापर करत पुणे – मुंबई महार्गावर स्मार्ट सिटी उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाची तब्बल एक ते दीड हजार हेक्टर जमीन मालकीची आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयी सुविधा निर्माण केल्या जातील.

काय काय उभारले जाईल?

महामार्गाबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे स्मार्ट सिटी निर्मितीसाठी हॉस्पिटल, कंपनी, मॉल, गृहप्रकल्प, रस्ते,पाणी, स्टेडियम, लोकोपयोगी प्रकल्प, वीज इत्यादिंची निर्मिती केली जाणार आहे.

का निर्माण केली जाणार आहे स्मार्ट सिटी?

वाढत्या लोकसंख्येमुळे एकच ठिकाणी गर्दी जमू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच द्रूगती महामार्ग हा लवकरच आठ पदरी केला जाणार असून त्यावरून वाहतूक संख्या वाढली जाईल या दृष्टिकोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर पुणे – मुंबईजवळ नव्याने रिंग रोड उभारला जाणार असून मुंबईत विमानतळ निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना व नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये व त्यांना इतर सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी स्मार्ट सिटीची निर्मिती केली जाणार आहे.