Mumbai Pune Hyperloop Train : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 25 मिनिटात; देशात धावणार पहिली हायपरलूप ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झाला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य झालं आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपरलूप ट्रेन चालवण्याची योजना आहे. त्यानुसार देशातील पहिली हायपरलूप ट्रेन (Mumbai Pune Hyperloop Train) मुंबई ते पुणे या मार्गावर धावेल. या ट्रेनमुळे मुंबई -पुणे अंतर अवघ्या २५ मिनिटात पार होणार आहे. सध्याच्या घडीला रेल्वेने किंवा रस्त्याने हे अंतर कापण्यासाठी ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. एवढच नव्हे तर विमानानेही हे अंतर कापण्यासाठी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो.

सुविधा कधी सुरू होणार? Mumbai Pune Hyperloop Train

पुण्यातील स्टार्टअप Quintrans Hyperloop ने 2032-33 पर्यंत सर्वसामान्यांना ही सुविधा देण्याची तयारी केली आहे. ही देशातील पहिली हायपरलूप ट्रेन असेल. मुंबई ते पुणे हायपरलूप ट्रेन यशस्वी झाल्यानंतर दिल्ली-चंदीगड आणि चेन्नई-बेंगळुरू या मोठ्या शहरांमध्येही अशा प्रकारच्या ट्रेन सुरु करण्याची योजना आहे. Quintrans Hyperloop चे संस्थापक प्रणय लुनिया म्हणतात की देशाला हाय-स्पीड वाहतुकीची गरज आहे. हायपरलूप तंत्रज्ञान ही पोकळी भरून काढू शकते. यामध्ये, कमी दाबाच्या नळीद्वारे घर्षण आणि कंपन कमी होते, ज्यामुळे ट्रेनचा वेग अतिशय जलद पद्धतीने वाढतो. या हाय[रलूप ट्रेनचे भाडे सुद्धा विमानाच्या दरापेक्षा कमी असेल. मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या हायपरलूप ट्रेनचे तिकीट अंदाजे 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत असेल.

मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोन्हीही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे असल्याने त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे 148 किलोमीटर आहे आणि जर विमानाच्या माध्यमातून प्रवास करायचा म्हंटल तर 45 मिनिटे वेळ लागतो तेच विमानतळावर सुद्धा तुमचा अतिरिक्त वेळ वाया जातो. याउलट हायपरलूप ट्रेनद्वारे (Mumbai Pune Hyperloop Train) तुम्ही अवघ्या 25 मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास करू शकता. त्यामुळे दोन्ही शहरातील लाखो प्रवाशांसाठी हि हायपरलुप ट्रेन अतिशय महत्वाची ठरेल यात शंका नाही.