Mumbai – Pune : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा प्रवास कमी वेळात व्हावा याकरिता अटल सेतू महत्वाची भूमिका बजावणार आहे. अटल सेतूवरून ठराविक वाहनांनाच सध्या प्रवास करण्याची मुभा आहे. त्यातच आता एस टी महामंडळाची शिवनेरी बस या मार्गावरून धावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे (Mumbai – Pune) दरम्यानचा एसटी प्रवासाचा वेळ आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू येथून मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बसेस चालवण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या विचाराधीन आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे (Mumbai – Pune) शिवनेरी बस अटल सेतूवरून घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने या मार्गावरील शिवनेरीचे नवे थांबे, टोलचा खर्च आणि या मार्गावर शिवनेरी चालवणे कितपत व्यवहार्य ठरेल, याचा विचार केला जात आहे.या सर्व चर्चेनंतर आता एसटी महामंडळाला अटल सेतू वरून मुंबई-पुणे शिवनेरी बस प्रायोगिक तत्त्वावर चालवता येणार आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी बस मुंबईवरून जी सुटेल त्यामध्ये 45 प्रवासी प्रवास करू शकतील. जर अटल सेतू वरून मुंबई पुणे (Mumbai – Pune) प्रवास सुरू झाला तर प्रवासाची वेळ ही एक तासाने कमी होईल. सुरुवातीला याची केवळ एक फेरी होण्याची शक्यता आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवनेरी बस रूट दादर शिवडी अटल सेतू उलवे पनवेल पुणे असा असेल.
किती वाचणार वेळ (Mumbai – Pune)
मागच्या अनेक दिवसांपासून मुंबई ते पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरून सोडण्यात यावी याची मागणी केली जात आहे. यातील काही मार्ग हा सिग्नल विरहित असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सिग्नल फ्री रुट मुळे मुंबईहून चिरले हा मार्ग केवळ वीस (Mumbai – Pune) मिनिटात कापला जाणार आहे. आणि मुंबई एक्सप्रेसवे पासून चिरले केवळ 60 किलोमीटर दूर आहे. अटल सेवा सेतू वरून शिवनेरीचा मार्ग प्रवासाचा विचार करता या रूट वरून परीक्षण सुद्धा सुरु करण्यात आले आहे.
पनवेल सह इतर थांबे घेता येणार नाहीत
अटल सेतू मार्ग वाशी-कळंबोली मार्गापेक्षा पुणे ते दादर हे अंतर पाच किलोमीटरने कमी करतो. याशिवाय वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन अटल सेतू येथून शिवनेरी बस घेतल्यास प्रवासाचा वेळ सुमारे तासभर कमी होऊ शकतो. मात्र, तुम्ही मुंबईहून अटल सेतूमध्ये प्रवेश केल्यास, तुम्हाला मुंबई-पुणे दरम्यानचे पनवेल एसटी स्थानक सोडावे लागेल. पनवेलसह इतर छोटे थांबे घेता येत नाहीत. (Mumbai – Pune)