मुंबई प्रतिनिधी । अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.
मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.#MumbaiRainsLive #MumbaiRain #mumbaimonsoon #Mumbai pic.twitter.com/wqfg7vkqmC— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2019
मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल -उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहिर केले.
राज्य शासनाचे आवाहन – “मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.”