हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र्राची राजधानी मुंबईत काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) सुरु झाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून काही ट्रेन या उशिरा धावणार आहेत. तर रस्त्यावरील वाहतूक सुद्धा संथ गतीने पाहायला मिळत आहे.
आज सुद्धा मुंबईत मुसळधार पाऊस – Mumbai Rain Update
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस सुरु राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये. मुंबईत काही सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेगही संथ झाला आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेही मंदावली आहे. मधय रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सकाळच्या वेळेला चाकरमान्यांना कामावर जायचं असतं, मात्र लोकल उशिरा धावणार असल्याने सर्व्ह काही विस्कळीत झालं आहे.
काय आहे लोकलची अवस्था ?
मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे 5 ते 6 मिनिट विलंबाने धावत आहे.
हार्बर रेल्वे सुद्धा 5 ते 6 मिनिट उशिराने धावत आहे.
कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत.
पश्चिम दृतगती महामार्गावरही वाहतूक मंद गतीने सुरु