Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग!! रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाची धुव्वाधार बॅटिंग (Mumbai Rain Update) सुरूच असून काल रात्रीपासून वरुणराजा धो धो कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबईतील रस्त्यावर पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईच्या लोकलवर सुद्धा परिणाम झाला असून मध्य रेल्वे १५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत तर वेस्टर्न रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. महापालिकेकडून अंधेरी आणि मालाड सबवे बंद करण्यात आले आहेत. एकूणच काय तर पावसामुळे संपूर्ण मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही पावसाचा जोर असाच काही तास वाढला तर मुंबई तुंबण्याची शक्यता आहे.

पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे (Mumbai Rain Update) मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मलबार हिल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. भांडुपचा एलबीएस मार्ग पाण्याखाली गेला आहे. अंधेरीचा सबवे बंद करण्यात आलाय. गोरेगाव, ओबेरॉय परिसरात पाणी साचलं आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. गोरेगाव मधील साईनाथ सबवे ची वाहतूक मदिना मंजिल उड्डाण पुलावरून वळवण्यात आली आहे. कांदिवली येथील शंकर मंदिर परिसरात सुद्धा पाणी साचलं आहे.. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम – Mumbai Rain Update

सतत कोसळणारा पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा धावत आहेत. कल्याणहून सीएसटीएम कडे येणाऱ्या ट्रेन उशिरा धावत आहेत. पश्चिम आणि हार्बर रेल्वे ५ मिनिटांनी उशिरा आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.