Mumbai Rain Updates : मुंबईत दिवसाही अंधार, सखल भाग पाण्याखाली, वाहतूक कोंडी कायम

Mumbai Rain Updates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Rain Updates । मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली आहे. शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. दिवसाही अंधार पडलेला आहे. नोकरीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे यामुळे मोठं हाल होत आहे. वाहनांच्या हेड लाईट दिवसाचं ऑन करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे, तर समुद्राला उधाण आल्यानं पालिका प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

ढग दाटून आल्याने अंधाराचे वातावरण- Mumbai Rain Updates

मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र ढग दाटून आल्याने अंधेरी, वांद्रे, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव परिसरात अंधाराचे वातावरण तयार झालं. पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाड्या धीम्या गतीने पुढे जात आहेत. तस बघितलं तर बोरिवली ते वांद्रे हा एक तासाचा प्रवास आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत याच प्रवासाला ३ तास लागत आहेत. त्यामुळे नोकरीसाठी घरातून बाहेर पडललेया नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. सध्या वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे

दरम्यान, आज सोमवारी सकाळी 9 वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा (Mumbai Rain Updates) जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळं शहरातील किंग्स सर्कल, सायन, हिंदमाता, वरळीमध्ये पाणी साचलं. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.