Mumbai Rain Updates : मुंबईला पावसाचा तडाखा!! अंधेरी सबवे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

Mumbai Rain Updates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Rain Updates मुंबईला आज मुसळधार पावसाचा तडाखा बसला. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज (25 जुलै) मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या पश्चिम द्रुतगती मार्गावरती धुव्वाधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे ला नदीचे स्वरूप आलं असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झालं आहे. तसेच ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका सहन करावा लागतोय.

कोणत्या भागात किती पाऊस- Mumbai Rain Updates

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये आज सर्वाधिक ३५ मिमी पेक्षा जास्त तीव्रतेचा पाऊस पडला. अंधेरी येथील मालपा डोंगरी म्युनिसिपल स्कूलमध्ये फक्त एका तासात ३६ मिमी पाऊस पडला, त्यानंतर केडब्ल्यू वॉर्ड ऑफिसमध्ये ३० मिमी आणि केई वॉर्ड ऑफिसमध्ये २९ मिमी पाऊस पडला. चकाला म्युनिसिपल स्कूल (२८ मिमी), गोरेगावमधील आरे कॉलनी स्कूल (२७ मिमी) आणि जोगेश्वरी येथील एचबीटी स्कूल (२६ मिमी) यासारख्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुले, नोकरदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर पोचण्यास तारेवरची कसरत करावी लागतेय. दुसरीकडे पूर्व उपनगरात, भांडुपमधील टेंबीपाडा, विक्रोळी, विहार तलाव आणि टागोर नगरसारख्या इतर अनेक ठिकाणी १८ ते २० मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain Updates)

दरम्यान, हवामान खात्याने आज कोकण, मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात जोरदार पाऊस सुरु असून पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. . पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा, सातारा, बुलढाणा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार व विजांसह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.