हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर देखील मुंबई मध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे मात्र मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने दिसत आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत
यंत्रणा सतर्क
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले आहे. इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याची सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलया आहेत.
याबरोबरच मुंबईत पंपिंग स्टेशन कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पहावं. तसंच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलिस व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.