मुलीची छेडछाड रोखणे जीवावर बेतले; राज्यस्तरीय बॉक्सरची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रोहतक : वृत्तसंस्था – रोहतकमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या तरुणांना रोखणे एका राज्य स्तरीय बॉक्सरला चांगलेच महागात पडले आहे. अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या आरोपींनी या बॉक्सरची चाकू भोकसून हत्या केली आहे. या बॉक्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हि घटना हरियाणातील रोहतक या ठिकाणची आहे. यामध्ये मृत झालेल्या राज्य स्तरीय बॉक्सरचे नाव कामेश आहे.सोमवारी कामेश आपल्या कुटुंबीयांसोबत रोहतकमधील तेज कॉलनीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. या ठिकाणी काही तरुण एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढत होते. हे पाहून कामेश त्यांना रोखण्यासाठी गेला असता आरोपी व कामेश यांच्यात वाद झाला. आरोपी आणि कामेश यांच्यातली बाचाबाची एवढी वाढली कि आरोपी तरुणांनी अचानक चाकू काढून कामेशवर हल्ला चढवला. आरोपींनी कामेशवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये कामेश मोठ्या प्रमाणात जखमी झाला. यानंतर आरोपी त्याला घटनास्थळावरून फरार झाले.

यानंतर स्थानिक नागरिकांनी कामेशला त्वरित रोहतकमधील पीजीआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण खूप रक्तस्राव झाल्याने कामेशचा उपचारादरम्यान कामेशचा मृत्यू झाला.मृत कामेश बॉक्सिंगशिवाय मॉडेलिंग आणि अभिनयदेखील करत होता. एका अल्पवयीन मुलीला छेडछाडीपासून वाचवायला गेलेल्या बॉक्सरची हत्या झाल्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment