मुंबई प्रतिनिधी | अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई स्टाॅक एक्जेंज मधील बाजार आज घसरला. सेन्सेक्समध्ये ३६८ अंकांची घसरण झाली. तर निफ्टी १०,७०० च्या खाली गेला आहे.
अर्थसंकल्पात नेमके काय असेल याबाबतच्या संभ्रमा मुळे शेअर बाजार कोसळल्याचे बोलले जात आहे. निवडणूक तोंडावर असल्याने यंदाच अर्थसंकल्प रोजगारभिमूख असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या योजना असल्यास त्याचा उद्योगांना फायदा होणार आहे. यामुळेच सोमवारी बाजारात चांगली खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. पण वास्तवात उलट झाले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक सकाळी काही मिनीटे सकारात्मक होता. पण त्यानंतर काही क्षणातच त्यात मोठी घट झाली. त्यानंतर जेमतेम २० ते ३० अंकांच्या चढ-उतारासह निफ्टी ‘रेड झोन’ मध्येच राहीला. दिवसअखेर ११९ अंकांच्या घसरणीसह तो १०,६५६ या नकारात्मक स्तरावर बंद झाला.