मुंबई | टेक्सी आणि रिक्षांवर आता तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. मुंबई शहरातील सर्व टेक्सी आणि रिक्षांवर आता हे दिवे पहायला मिळणार आहेत. टेक्सी ड्रायव्हर फ्रि आहे की टेक्सीत प्रवासी आहेत हे ग्राहकांना कळावे याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
मुंबईत ग्राहक आणि टेक्सी चालक यांच्यात वादावादी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता यातून तोडगा काढण्यासाठीच टेक्सींना तीन रंगाचे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाल, पांढरा, हिरवा अशा तीन रंगाचे हे दिवे असणार आहेत.
दरम्यान लाल म्हणजे ड्रायव्हर पेसेंजर कॅरी करत आहे, पांढरा म्हणजे ड्रायव्हरला कुठेही यायचे नाही तर हिरवा म्हणजे ड्रायव्हर फ्रि आहे असा निष्कर्ष ग्राहक करु शकतात. टेक्सी आणि रिक्षांवर रंगीत दिवे लागल्यानंतर ग्राहक आणि टेक्सीचालक यांच्यातील वादावादी कमी होईल अशी आशा आहे.