हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील नागरिकांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी “वंदे भारत एक्सप्रेस” (Vande Bharat Train) सुरू करण्यात आली आहे. आता प्रवाशांचा वंदे भारत ट्रेनसाठी वाढत चाललेला प्रतिसाद बघता ही ट्रेन इतरही भागात सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. खास गोष्ट म्हणजे, या वंदे भारत ट्रेनने उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गोव्यालाही फिरायला जाता येऊ शकते. ही सुविधा मुंबईवरून देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनची माहिती जाणून घ्या.
वंदे भारत ट्रेनने गोव्याला जायचे असल्यास ही ट्रेन मुंबईवरून पकडावी लागेल. मुंबई ते गोवा वंदे (Mumbai To Goa) भारत ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते. ही ट्रेन शुक्रवारची सुरू नसते. मुंबई ते गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे थांबे दादर, ठाणे, पनवेल, खेड, कणकवली, रत्नागिरी आणि थिविम आहेत. या ट्रेनने प्रवास करण्यासाठी 7 तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु वंदे भारत ट्रेन ऐवजी दुसऱ्या वाहनाने गोव्याला जाण्याचा प्लॅन केल्यास अधिक वेळ जाऊ जातो. त्यामुळे वंदे भारत ट्रेन गोव्याच्या ट्रीपसाठी सर्वोत्तम पर्याय ठरते.
वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक पहा
मुंबई ते गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथून सकाळी 05:25 मिनिटांनी निघते आणि दादरला सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी पोहोचते. पुढे ठाण्याला ही ट्रेन 9 वाजून 45 मिनिटांनी पोहचते. तर कणकवलीत सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी पोहचते. यानंतर थिविमला येथे 12 वाजून 16 मिनिटांनी पोहचते. पुढे मडगाव येथे 1 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते.
गोव्यावरून परततानाचे वेळापत्रक
मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 22230 मडगाव येथून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी निघते. पूढे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी पोहोचते.
तिकिटाचे दर
दादर ते मडगाव चेअर कारचे तिकीट दर 1595 रुपये आहे. तर 3115 रुपये एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे तिकीट आहे.
ठाणे ते मडगाव चेअर कारचे तिकीट दर 1570 रुपये आहे तर 3045 रुपये एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट आहे.
मुंबई ते मडगाव चेयर कारचे तिकिट दर 1595 रुपये आहे तर 3115 रुपये एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकिट आहे.