Mumbai To Madgaon Train : मुंबईतून कोकणात धावणार स्पेशल ट्रेन; पहा वेळापत्रक आणि थांबे

Mumbai To Madgaon Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Madgaon Train । मुंबईतून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने रेल्वेला नेहमीच मोठी गर्दी बघायला मिळते. त्यातच सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे आणि उद्यापासून १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असेल. यापार्श्वभूमीवर परतीच्या प्रवासात प्रवाशाना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे विभागाने मुंबई आणि गोवा दरम्यान, एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हि ट्रेन कोकणच्या निसर्गातून धावणार आहे. मुंबईतून कोकणात धावणाऱ्या या स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांची गर्दी आटोक्यात येईल. या ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल? कोणकोणत्या स्थानकांवर तिला थांबा असेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

कसं असेल वेळापत्रक? Mumbai To Madgaon Train

ट्रेन क्रमांक ०१५०२ हि विशेष रेल्वे १७ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१५०१ हि विशेष रेल्वे १८.०८.२०२५ (सोमवार) रोजी सकाळी ०८.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला पोहोचेल.(Mumbai To Madgaon Train)

कोणकोणत्या स्थानकावर थांबा –

मुंबईतून कोकणात धावणारी ही विशेष (Mumbai To Madgaon Train) ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

कशी असेल ट्रेनची रचना –

ही विशेष रेल्वेगाडी 20 डब्ब्यांची असेल. या ट्रेन मध्ये एक एसी-२ टियर, तीन एसी-३ टियर, दोन एसी-३ टियर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास, १ जनरेटर कार आणि १ सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. १३ ऑगस्ट २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर या स्पेशल ट्रेन साठी बुकिंग सुरु झालं आहे.