Mumbai To Nashik Local Train : मुंबई लोकल ट्रेन थेट नाशिकपर्यंत धावणार? नव्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai To Nashik Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Nashik Local Train । नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि यामुळे भविष्यात मुंबई ते नाशिक या दरम्यान लोकल धावू शकते अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे मार्ग उभारण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक-मुंबई लोकल ट्रेन आणि अनेक नवीन सेवा सुरू करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या “स्लॉट अनुपलब्धता” या दीर्घकाळाच्या समस्येचे अखेर निराकरण होईल.

131 किलोमीटरचा रेल्वेमार्ग – Mumbai To Nashik Local Train

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा केला. नाशिक-मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी तसेच नवीन एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु रेल्वे प्रशासनाने सातत्याने “स्लॉटची उपलब्धता नसणे” हे प्राथमिक आव्हान म्हणून अधोरेखित केले. परंतु आता सुमारे 131 किलोमीटरच्या या मार्गांवर दोन नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या औपचारिक मंजुरीमुळे आता नाशिक-कसारा लोकल सेवा सुरु होण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. यानंतर प्रकल्पाच्या संदर्भातील परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर, खासदार राजाभाऊ वाजे अपुरी रेल्वे लाईन क्षमता हेच यामागील खरे मूळ कारण असल्याचे ओळखले . Mumbai To Nashik Local Train

मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई मार्गांच्या मंजुरीमुळे, नाशिक-मुंबई लोकल प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा सार्वजनिक-केंद्रित प्रकल्प आता अंमलबजावणीच्या जवळ येत आहे. नाशिक-कसारा दरम्यान दोन नवीन रेल्वेलाईन टाकण्यास मंजुरी मिळाल्याने नाशिकहून कसारा आणि कसाऱ्याहून मुंबई किंवा थेट नाशिकहून मुंबई अशी लोकल सेवा सुरु होईल या शक्यतेला बळ मिळालं आहे.