‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ 25 डिसेंबरला खुला होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी लवकरच सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्सहर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई ट्रान्सहर्बर लिंकचे 25 डिसेंबर रोजी उदघाटन होण्याची शक्यता आहे.

25 मिनिटात गाठता येणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ:

मुंबई ट्रान्सहर्बर लिंक सुरु झाल्यानंतर मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी लागणार आहे. दक्षिण मुंबई येथील प्रवाश्यांना वाशी पुलावरून नवी मुंबई गाठण्यासाठी 1 ते 2 तास इतका वेळ लागतो. परंतु आता मुंबई ट्रान्सहर्बर लिंकमुळे फक्त 25 मिनिटात दक्षिण मुंबई मधील प्रवाशी नवी मुंबई शहराला बायपास करून कोकणातील आपला प्रवास जलद गतीने सुरु ठेऊ शकतो. तसेच मुंबई ते पुणे प्रवास देखील अधिक जलद होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि JNPT बंदराशी कनेक्टिव्हिटी वाढून प्रवास जलद होणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगर व नवी मुंबई येथील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे.

हायटेक टोल पद्धतीच्या वापरामुळे वेळ वाचणार:

मुंबई ट्रान्सहर्बर लिंक हा देशातील पहिला पूल असेल ज्यावर ‘ओपन रोड टोलिंग’ (ओआरटी) प्रणाली सुविधा उपलब्ध असेल. या प्रणालीचा उद्देश टोल वसुली प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि वाहतूक सुरळीत आणि सुलभ करणे हा आहे. खुल्या टोल पद्धतीमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी पुलावर थांबावे लागणार नाही. या पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या वाहनांवरही फास्टॅग लावण्याची गरज नाही. ड्रायव्हरच्या खिशात किंवा वाहनात ठेवलेला फास्टॅग स्कॅन करण्यासाठी पुलावर हायटेक कॅमेरे बसवले जात आहेत.

मुंबई ट्रान्सहर्बर लिंकचे 96 % काम पुर्ण :

मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू हा एकूण 22.8 km लांबीचा सागरीसेतू असून सध्याच्या  घडीला हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. हा पूल दक्षिण मुंबईला समुद्रमार्गे  नवी मुंबईला जोडण्यात सक्षम  आहे.हा पूल बांधण्यासाठी 18 हजार कोटी रुपये खर्च आला. आजपर्यंत मुंबई ट्रान्सहर्बर लिंकचे 96 % काम पुर्ण झालेले आहे.