मुंबईत वाहतुकीची समस्या मोठी आहे. मुंबईकर हे वाहतुकीसाठी लोकल आणि ‘बेस्ट’ चा वापर करतात मात्र अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर असून लवकरच मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो सुद्धा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो -३ कॉरिडोरची सेवा सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या फेज साठी रोलिंग स्टॉक साठी मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर स्टेशनसाठी सीएमआरएस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच आता मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरे ते बीकेसी या मेट्रोच्या मार्गावरच्या सगळ्या स्थानकांचे काम पूर्ण झालं असून पहिल्या फेजमध्ये १२.४४ किलोमीटरच्या मार्गावर रोज मेट्रोच्या 96 फेऱ्यांचा नियोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
दर साडेसहा मिनिटाला एक मेट्रो
महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक मार्गावर साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्गावर व्यवस्थित सेवा सुरू झाल्यानंतर सहा मिनिटांचा कालावधी तीन मिनिटांवर आणण्यात येणार आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या फेजमध्ये प्रवास करण्यासाठी दहा ते पन्नास रुपये इतका खर्च होणार आहे तर मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर जर प्रवास करायचा असेल तर 70 रुपये इतका खर्च येईल. मेट्रोची ही संपूर्ण सेवा 2025 पर्यंत सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही भिडे यांनी सांगितलं.
पावसातही मेट्रोपर्यंत पाणी येणार नाही
मुंबईत जराजरी पाऊस पडला तरी वाहतुकीची दणादान होते. रस्त्यांवर पाणी साचते तर लोकलची सेवा सुद्धा पावसामुळे ठप्प होते. मात्र अंडरग्राउंड मेट्रोच्या बाबतीत असं होणार नाही असं भिडे यांनी सांगितला आहे. गेल्या 100 वर्षातील पावसाचा अभ्यास करून मेट्रो तीनचे काम करण्यात आले आहे. अभ्यासानुसार पाणी बाहेर पडण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतो पण मेट्रो पर्यंत पावसाचे पाणी येणार नाही मेट्रो तीन कॉरिडोर शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. ही संपूर्ण लाईन सुरु झाल्यामुळे रस्त्यावरील साधारणपणे साडेसहा लाख वाहनांचा भार कमी होणाऱ्या मेट्रोवन आणि मेट्रो सेवन कनेक्ट झाल्यामुळे इतर मार्गावरील प्रवाशांना प्रवास करणं सोयीच होईल असं भिडे यांनी सांगितले.