Mumbai Underwater Till 2050 | 2050 पर्यंत संपूर्ण मुंबई समुद्रात बुडणार; धक्कादायक रिपोर्ट समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Underwater Till 2050 | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ देखील आहे. ज्याला भेट देण्यासाठी अनेक लोकल लांब लांब वरून येत असतात. मुंबईला या स्वप्नांची नगरी देखील म्हंटले जाते. मुंबईत गेल्यानंतरच माणूस खऱ्या अर्थाने जीवन काय असते. हे जगायला शिकतो. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया , पॉईंट कुलाबा, शिवाजी पार्क तसेच सीएम सिटी स्टेशन यांसारखी अनेक ठिकाण आहे. जी मुंबईची शान आहेत. परंतु याच मुंबईकरांसाठी एक अत्यंत वाईट गोष्ट समोर आलेली आहे. ती म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार येत्या काही वर्षातच हे संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. अशी भीती वर्तवण्यात आलेली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे आता दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरचा बर्फ वितळायला लागलेला आहे. जर हा बर्फ वितळण्याचा वेग कायम राहिला, तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. आणि त्यामुळे 2050 पर्यंत मुंबई संपूर्ण पाण्याखाली जाईल, असा अंदाज कोडी-ऑर्डिनेटर डायनोसॉय या संस्थेने वर्तवलेला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कुलाबा मलबार हिल,दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर वर्सोवा हे समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकतात. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फ असाच वितळायला लागला तर मुंबईसाठी हा एक खूप मोठा धोका आहे. परंतु हा धोका केवळ मुंबईसाठीच नाही, तर मुंबई जवळील ठाणे, नवी मुंबईला देखील असणार आहे. त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी देखील वाढत आहे. ही वाढ जर अशीच राहिली तर मुंबई नक्कीच पाण्याखाली जाईल शिवाजी पार्कच्या परिसरात समुद्राचा पाणी यायला सुरुवात झालेली आहे. परंतु हे पाणी येण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आलेली आहे.

भारतातील मुंबई आणि कोलकत्ता तील इतर अनेक शहरांना देखील समुद्राच्या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. मुंबई सोबत समुद्राच्या पाण्याखाली जाणाऱ्या शहरांमध्ये सुरत, ओडिसा, केरळ आणि तमिळनाडू यांसारख्या शहरांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आणि या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या जवळपास दहा देशांच्या लोकसंख्येवर याचा परिणाम होणार आहे. आणि भारत या यादीत सगळ्यात वरच्या स्थानी आहे. केवळ भारतालाच नाही तर जगभरातील अनेक देशांना या समुद्राच्या पाण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे.

आतापर्यंत हवामानाच्या बदलामुळे जगातील पाच शहरे ही समुद्राच्या पाण्याखाली बुडालेली आहे. इजिप्तमधील थॉमीज, इटालियाचे बाया शहर, इंग्लंड मधील डरमेन्ट गाव जमाईकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिना मधील विला ही शहरे समुद्राच्या पाण्याखाली बुडालेली आहेत.