हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Water Taxi । मुंबईतील वाहतुकीत मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहे. प्रवाशांचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत वॉटर टॅक्सी पुन्हा एकदा सुरु करण्याचा प्लॅन सरकारने आखला आहे. एकूण १० जलमार्गावरून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी २९ टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे २,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत एक बैठक घेतली.
नितेश राणे यांनी या बैठकीचे फोटो ट्विट करत म्हंटल, मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो (Mumbai Water Taxi) ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणावर सकारात्मक चर्चा करून वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, कोची मेट्रो रेल चे अधिकारी यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई वॉटर मेट्रोसाठी (Mumbai Water Taxi) एकूण २९ टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत. यासाठी १० महत्त्वाच्या जलमार्गांची निवड करण्यात आली असून, हे मार्ग उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, नवी मुंबई, वर्सोवा, वरळी आणि बांद्रा यांसारख्या प्रमुख भागांना जोडणार आहेत. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अतिशय जलद पद्धतीने जात येईल. तसेच लोकल ट्रेनच्या गर्दीचा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही. मुंबईतील विविध भागांतून जलमार्गाने सहज आणि वेळेची बचत करत प्रवास शक्य होणार आहे.
कोणकोणत्या मार्गावरून धावणार वॉटर टॅक्सी ? Mumbai Water Taxi
१) नारंगी-खरवडेश्वरी (1 किमी) विरारजवळ
२) वसई-मीरा भाईंदर-गायमुख-नागळे (16 किमी)
३) काल्हेर-कोलशेत-मुलुंड-ऐरोली-वाशी-DCT-गेटवे (50 किमी)
४) गायमुख-काल्हेर-मुंब्रा-कल्याण (31 किमी)
५) नवीन विमानतळ-बेलापूर-वाशी (14 किमी)
६) वसई-मार्वे-नरीमन पॉइंट (६१ किमी)
७) बोरिवली-गोराई-मार्वे-मनोरी (6 किमी)
८) रेवस-कारंजा-गेटवे (19 किमी)
९) बेलापूर-गेटवे-मांडवा (38 किमी)
१०) गेटवे-एलिफंटा-न्हावा (17 किमी)




