मुंबई । रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचाफटाका वाहतुकीला बसला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. काही ठिकाणी घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे.
कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.
Maharashtra: Western Express Highway blocked at Makar, following heavy rainfall overnight pic.twitter.com/h2cuD8Xbpa
— ANI (@ANI) August 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”