औरंगाबाद | कोर्टाने अनु जाती-जमाती, ओबीसी अधिकारी कमर्चारी यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करण्या संदर्भात राज्यसरकारला कोणतेही आदेश दिलेले नसताना, महाविकास आघाडी सरकारनेच्या आरक्षण उपसमितिचे अध्यक्षांनी 7 में रोजी पदोन्नति मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. जो पूर्णता संविधाना विरोधी आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे.अशी भूमिका आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीने मंडली आहे.
हा निर्णय मागसवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय करणारा आहे. या निर्णयाने समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. असे आरोप करत व या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या निषेध म्हणून आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीच्या वतीने भडकल गेट येथे मुंडन आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलन प्रसंगी किशोर थोरात, प्रा सुनील वाकेकर, अरुण बोर्डे, नागराज गायकवाड, विजय वाहूळ, लक्ष्मण हिवराळे, आनंद कस्तुरे, संदीप जाधव, सचिन बोर्डे, सतीश पट्टेकर, अरविंद कांबळे, एड शिरीष कांबळे, आनंद लोखंडे, जयश्री शिर्के, सचिन गंगावणे, अजय म्हस्के, मुकेश खोतकर, नरेश वरठे, जयकीशन कांबळे, काकासाहेब काकडे, अशोक भातपुडे, नरेश पाखरे, पवन पवार, आनंद बोर्डे, सचिन खाजेकर, सूचित सोनावणे, संदीप पट्टेकर, संदीप नाथभजन, सुमित जमधडे, विश्वजीत काळे, वैभव दळवी, मिलिंद बनसोडे, मुकेश वाहूळ, श्याम इंगळे, कपिल बनकर, सोनू नरवडे, बलवान शिंदे, प्रकाश नवतुरे, मनोज वाहूळ, कुंदन खंडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते