मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात मात्र…; ओवेसींनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आनणे अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार वर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी” असं ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली आहे.

ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या स्थापनेवरूही निशाणा साधला. “जर सरकार दुसऱ्या लाटेसाठी तयार असतं आणि त्यांचा वागणूक निष्काळजीपणाची नसती तर याची गरज पडली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरून सरकार घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य कसे खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसून येते. कार्यकारी क्षेत्रात न्यायालयाचा हा एक प्रकारचा हस्तक्षेप आहे,” असंही ओवेसी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

 

 

Leave a Comment