औरंगाबाद | महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यांना काल शनिवारी काहीसा ञास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वँब दिला होता. त्यांचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहीती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी, मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे प्रमुख अधिकारी कोरोना पॉझीटिव्ह निघाल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या प्रशासकीय कामावर झाला आहे. माञ आयुक्त पाण्डेय आता हेच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पालिकेचे कामकाज आणखी ढेपाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाण्डेय होम आयसोलेट होण्याच्या तयारीत असल्याचे सूञांनी सांगितले.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोडकर यांनी सांगितले की, आयुक्त पाण्डेय यांना काल ताप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वँब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला. माञ त्यांच्यात नॉर्मल सिम्टम्स् जाणवले आहेत, काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आयुक्त पाण्डेय यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केल्याचे सूञांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou